Welcome To Nirantar Sanskrit Class
The Best Sanskrit Class in Pune with experience of over 24 years, Nirantar Sanskrit Varga has evolved amazingly, both in its scale and the quality of education. Personal attention from the teacher plays a crucial role in helping students score in exams and thus fulfil parents' dreams.
Grammer Workshops
Specialized in teaching complete Sanskrit grammar to 10th S.Sc Composite Sanskrit and entire Sanskrit students in 4 hours.
Yearly Classes
We provide expert teaching solutions for the Best Sanskrit classes in Pune from 5th to 12th onwards ( SSC, CBSE, HSC, NIOS, and Special Exams ).
Book Library & Store
It will help students understand the logic and create the correct answers. More than 50 self-learning modules have been created by the author of this book.
Upcoming Events
hello
01
Jan
2022Sanskrit Grammer Workshop
If you are facing problems understanding or memorising Sanskrit grammar, The Nirantar Sanskrit Varga workshop is the place for you. This workshop makes sure that you understand and learn all the exam-oriented Sanskrit grammar in a simple language so that it is easy to remember. We are The Best Sanskrit Class in Pune helping the students improve their ability to understand logic and formulate solutions,…
- 08:00 - 20:00 (May 1, 2023)
- Chintamani Society, karvenagar, Pune
आजच्या तरुण भारत मध्ये आली आहे बातमी
Best Sanskrit Classes in Pune Available For Online & Offline
JOIN NOWLatest Posts
अभिज्ञान संस्था , पुणे यांच्याकडून गुणी जन गौरव 2022
अभिज्ञान संस्था , पुणे यांच्याकडून गुणी जन गौरव 2022 हा पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणी जनांसोबत मला देण्यात आला , याबद्दल सौ. मानसी ताई तसेच श्री. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर सर यांचे विशेष आभार… ही गौरव चिन्हे जरी आता यशाकडे बघून दिलेली असली तरी ही यशामागील प्रयत्न आणि यशामागील अपयशांना दिलेली उत्तरे असतात असे मी मानत आहे. आपल्या संस्थेचे गौरव चिन्ह स्वरूप हे अतिशय संस्मरणीय आहे. मेडल वर आपले नाव असावे ,, प्रमाणपत्रावर आपले भावचित्र असावे , हे शालेय जीवनापासून पाहत असलेले स्वप्न कर्मप्रधान आयुष्य जगताना अचानक पूर्ण झाले. या पुरस्काराचे खरे हक्कदार मला विद्यार्थ्यांना मदत करता यावी यासाठी टेक्निकल गोष्टी शिकवत असलेली माझी मुलं आर्विक्षा , अक्षर आणि माझे यजमान विनय पवार आहेतच पण त्याचबरोबर माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतलेले असंख्य विद्यार्थीदेखील आहेत. खरे पाहता हा पुरस्कार मिळून बरेच दिवस लोटले तरी हा पुरस्कार माझी आई सौ. मीनल आणि वडील श्री. प्रवीण तेलकर यांना दाखवण्याची इच्छा होती. त्यानुसार त्यांना दाखवून मग मी ही पोस्ट शेअर करत आहे, कारण ते आईवडीलच असतात जे आनंदाचे क्षण समाधानात परावर्तित करतात ,, धन्यवाद
Abhidyan Pune Gunijan Gaurav 2022
अभिज्ञान, पुणे द्वितीय वर्धापन दिनानिमित्त गुणीजन गौरव पुरस्काराची घोषणा पुणे संस्कृती, संस्कृत आणि सृजनशीलता हे ब्रीद घेऊन कार्य करणाऱ्या अभिज्ञान, पुणे संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत गुणीजनांचा गौरव करण्यात येणार आहे. नुकतेच अभिज्ञान, पुणे च्या संचालिका सौ. मानसी चं. सोनपेठकर आणि मार्गदर्शक ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार अल्पावधीतच वाचकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या दै. आधुनिक केसरी या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. संजय व्यापारी आणि वारकरी संप्रदायाचे मुखपत्र, संत विचारांना प्राधान्याने प्रसिद्धी देणाऱ्या सा. पंढरी संदेशचे संपादक श्री. रामकृष्ण बिडकर यांना घोषित करण्यात आला आहे. तर साहित्य क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका सौ. अर्चना डावरे यांना घोषित झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार श्रीसिद्धिविनायक एज्युकेशन्सचे संचालक सुप्रसिद्ध गणित अध्यापक श्री. विराज आडे यांना घोषित झाला आहे. संस्कृत अध्यापन क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार online संस्कृत अध्यापनासाठी प्रसिद्ध सौ. आरती पवार आणि सिद्धहस्त संस्कृत अध्यापिका सौ. आरती लवाटे यांना घोषित करण्यात आला आहे. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार सा रे ग म प लिटील फेम चि. प्रज्योत प्रकाश गुंडाळे आणि नृत्यविशारद कु. गिरीजा वैभव वाडीकर यांना घोषित झाला आहे. अभिज्ञान, पुणे द्वारे लवकरच प्रस्तुत पुरस्कार उपरोक्त गुणीजनांना सन्मानपूर्वक वितरित केले जाणार आहेत.