अभिज्ञान, पुणे द्वितीय वर्धापन दिनानिमित्त गुणीजन गौरव पुरस्काराची घोषणा
पुणे
संस्कृती, संस्कृत आणि सृजनशीलता हे ब्रीद घेऊन कार्य करणाऱ्या अभिज्ञान, पुणे संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत गुणीजनांचा गौरव करण्यात येणार आहे. नुकतेच अभिज्ञान, पुणे च्या संचालिका सौ. मानसी चं. सोनपेठकर आणि मार्गदर्शक ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार अल्पावधीतच वाचकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या दै. आधुनिक केसरी या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. संजय व्यापारी आणि वारकरी संप्रदायाचे मुखपत्र, संत विचारांना प्राधान्याने प्रसिद्धी देणाऱ्या सा. पंढरी संदेशचे संपादक श्री. रामकृष्ण बिडकर यांना घोषित करण्यात आला आहे. तर साहित्य क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका सौ. अर्चना डावरे यांना घोषित झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार श्रीसिद्धिविनायक एज्युकेशन्सचे संचालक सुप्रसिद्ध गणित अध्यापक श्री. विराज आडे यांना घोषित झाला आहे. संस्कृत अध्यापन क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार online संस्कृत अध्यापनासाठी प्रसिद्ध सौ. आरती पवार आणि सिद्धहस्त संस्कृत अध्यापिका सौ. आरती लवाटे यांना घोषित करण्यात आला आहे. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार सा रे ग म प लिटील फेम चि. प्रज्योत प्रकाश गुंडाळे आणि नृत्यविशारद कु. गिरीजा वैभव वाडीकर यांना घोषित झाला आहे.
अभिज्ञान, पुणे द्वारे लवकरच प्रस्तुत पुरस्कार उपरोक्त गुणीजनांना सन्मानपूर्वक वितरित केले जाणार आहेत.
- 14 Apr
- 2022