अभिज्ञान संस्था , पुणे यांच्याकडून गुणी जन गौरव 2022 हा पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणी जनांसोबत मला देण्यात आला , याबद्दल सौ. मानसी ताई तसेच श्री. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर सर यांचे विशेष आभार… ही गौरव चिन्हे जरी आता यशाकडे बघून दिलेली असली तरी ही यशामागील प्रयत्न आणि यशामागील अपयशांना दिलेली उत्तरे असतात असे मी मानत आहे. आपल्या संस्थेचे गौरव चिन्ह स्वरूप हे अतिशय संस्मरणीय आहे. मेडल वर आपले नाव असावे ,, प्रमाणपत्रावर आपले भावचित्र असावे , हे शालेय जीवनापासून पाहत असलेले स्वप्न कर्मप्रधान आयुष्य जगताना अचानक पूर्ण झाले. या पुरस्काराचे खरे हक्कदार मला विद्यार्थ्यांना मदत करता यावी यासाठी टेक्निकल गोष्टी शिकवत असलेली माझी मुलं आर्विक्षा , अक्षर आणि माझे यजमान विनय पवार आहेतच पण त्याचबरोबर माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतलेले असंख्य विद्यार्थीदेखील आहेत. खरे पाहता हा पुरस्कार मिळून बरेच दिवस लोटले तरी हा पुरस्कार माझी आई सौ. मीनल आणि वडील श्री. प्रवीण तेलकर यांना दाखवण्याची इच्छा होती. त्यानुसार त्यांना दाखवून मग मी ही पोस्ट शेअर करत आहे, कारण ते आईवडीलच असतात जे आनंदाचे क्षण समाधानात परावर्तित करतात ,, धन्यवाद
- 30 May
- 2022